यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सर्प विज्ञान विषयी चित्रप्रदर्शन

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सर्पविज्ञान अर्थात सापः समज गैरसमज या विषयावर प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र विभागातर्फे मंगळवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते सुनिल चौथमल यांचे चित्रप्रदर्शन आणि पी. पी. टी. व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक पंडित होते. 

या वेळी सापाच्या विविध जाती, सापाविषयी सामान्य जनात असणाऱ्या अंधश्रद्धा, सर्पदंश झाल्यानंतर घ्यावयाची काळजी आदींबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे आणि त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

प्रारंभी जिल्हा प्रधान सचिव प्रा. शिवाजी वाठोरे यांनी प्रास्ताविक केले. वैज्ञानिक जाणिवांचे प्रा. डॉ. जगदीश सावदेकर यांनी सूत्रसंचालन तर डॉ. पी. एस. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. जी. एन. मोरे, उपप्राचार्य संतोष लक्कस, अंनिस कार्यकर्ते हरिदास वाघ, प्रकाश दौड, डॉ. सुनिता जावळे, डॉ. एस. टी. नाफडे, डॉ. के. व्ही. बदर, डॉ. विजय सानप, डॉ. ज्ञानेश्वर शेजुळ, प्रा. निलेश मिसाळ, प्रा. प्रेम जैन, प्रा. ताराचंद जैस्वाल, डॉ. रोहिणी पुंडगे, आदींसह विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.